संगमनेर ( गर्जा सह्याद्री न्यूज ) -
पाणलोट विकास कार्यक्रम ,जलयुक्त शिवार अभियान व त्याला मिळालेली भव्य अशी लोकसहभागाची जोड यामुळे जुन्नर तालुक्यातील वडगाव-आनंदच्या पादिरवाडीचा  कायापालट झाला आहे.पाणी टंचाई प्रश्न मिटून आज बागायती क्षेत्राकडे वाटचाल करत असलेली पादीरवाडी महाराष्ट्राच्या नकाशावर या पॅटर्नच्या कामगिरीसाठी प्रख्यात होऊ लागली आहे.
अवर्षणप्रवण भाग अशी ओळख असलेल्या पादिरवाडीचा कायापालट होण्यास केंद्र सरकारचा पाणलोट विकास कार्यक्रमच आधार ठरला.या अंतर्गत प्रवेश-प्रेरक उपक्रम अंतर्गत मातीबंधाऱ्याचे पाईपलाईनने जलपुनरभरण करण्यात आले.अन येथेच पुढील कामांना चालना मिळत गेली.जलयुक्त शिवार अंतर्गत या गावाचा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही कायापालट करण्याचा महत्त्वांकाक्षी निर्णय घेतला.शासनाचे विविध विभाग यामध्ये पुढे आले अन लोकसहभागाची त्याला चांगली साथ मिळाल्याने पाहता-पाहता ६३ नाला बंधाऱ्याची परिसरातील ओढ्यावर बांधणी झाली
पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून पाईपलाईनने पाणी या बंधाऱ्यात सोडल्याने आज या अवर्षणप्रवण भागाचा पूर्णपणे कायापालट झाला आहे आज मोठे क्षेत्र हे बागायताकडे वाटचाल करत असून पादिरवाडीच्या या पॅटर्न चे नाव आता पुणे जिल्हातच नव्हे तर महाराष्ट्राच्या नकाशावरही या पॉटर्नची चर्चा होऊ लागली आहे.
  ( प्रतिनिधी - नितीन शेळके )
 
Top