संगमनेर ( पुणे सुपरफास्ट न्यूज ) -
दाखल
गुन्ह्यात वाढीव कलम न लावण्यासाठी १0 हजार रूपयांची लाच स्वीकारताना शहर
पोलीस ठाण्याच्या सहायक फौजदारास अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर
पोलीस ठाण्यात एका आरोपीविरूध गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यात वाढीव
कलम न लावण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बाळासाहेब नवृत्ती
नवाळी( वय ५४) यांनी १0 हजार रूपयांची मागणी केली. दरम्यान संबंधिताने
नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी
सायंकाळी साडेसात वाजता नगरहून आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा
लावला व नवाळी यास रंगेहाथ पकडले. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
उपअधीक्षक इरफान शेख, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सहभाग घेतला.
( प्रतिनिधी - नितीन शेळके )