( वन कर्मचा-यांच्या सुट्टी नंतर रात्रीस खेळ चाले )
माळशिरस ( पुणे सुपरफास्ट न्यूज ) - महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व पुणे पुणे जिल्ह्यात शिल्पकलेचा खजिना असणा-या भुलेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत वन उद्यान दिसते . माळशिरस गाव पुर्वी याच ठिकाणी असल्याच्या खुणा आजही या ठिकाणी सापडतात. १६ व्या शतकात आदिलशाहीतील सरदार मुरार जोगदेव याने पुण्याच्या संरक्षणार्थ याठिकाणी दौलत मंगळ किल्याची बांधणी केली . त्यानंतर याठिकाणी बरीच आक्रमणे सुध्दा झाली यामुळेच माळशिरस गाव स्थलांतरीत झाल्याचे बोलले जाते.
या वन उद्यानात वन कर्मचा-यांच्या सुट्टी नंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेउन मद्यपी मद्य पीण्यासाठी बसतात व मद्य पील्यानंतर नशेत तिथेच बाटल्या फोडतात . यामुळे येथील वन्यजीवन धोक्यात आले आहे व जवळच असणा-या भुलेश्वर देवस्थान चे पावित्र्य धोक्यात आले आहे . अशी कृत्ये करणा-यांना लवकरात लवकर आळा घालण्याची गरज असल्याची भावना पर्यटक व भाविकांमधुन व्यक्त होत आहे .

( प्रतिनिधी - विनय गुरव )