माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्यूज) :
पुरंदरच्या पूर्व भागातील नायगाव ग्रामपंचायत मद्दे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली.या वेळी ग्रामपंचायतिच्या सरपंच सौ.दिपाली प्रवीण जगताप यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालन्यात आला.ग्रामपंचायेतीचे माजी सदस्य बाळासाहेब कड यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला .या वेळी ग्रामसेवक श्री . धायगुडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना भारतीय संविधानाची शपथ दिली.सोपानकाका बँकेचे संचलाक श्री.मारुती पाटोळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगितले.ग्रामपंचयात सदस्य श्री.चंद्रकांत चौंडकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर खळदकर,उत्तम ठवाळ,अनिल शेंडगे,मंदाकिनी कड,मंगल मेमाणे तसेच ग्रामस्थ पोपट पाटोळे,संदीप पाटोळे,सविंद्र पाटोळे,रवींद्र गायकवाड,पप्पु सुपाळे,दिलीप गायकवाड,सुदर्शन चौंडकर,महादेव शेंडगे आदि ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी -विनय गुरव)
