पुणे (पुणे सुपरफास्ट न्यूज)- ग्रॅविटी जिम अँड हेल्थ सर्विसेस च्या वतीने येत्या शनिवारी, 30 एप्रिल रोजी सारसबागे जवळील सणस ग्राउंड येथे ग्रॅविटी मेगा श्री 2016 या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 100 हून अधिक स्पर्धकांचा यात सहभाग असून 55 ते 70 व त्या पुढे अशा वजन गटा मधे ही स्पर्धा घेतली जाणार आहे. विजेत्यांना स्मृति चिन्ह व रोख रक्कम देण्यात येणार असून अपंग विभागातील सर्वोत्तम 3 स्पर्धकांना ग्रॅविटी जिम अँड हेल्थ सेर्वीसेस कडून 3 वर्षांसाठी दत्तक घेण्यात येणार आहे. त्यांना व्यायाम शाळेतील सर्व सुविधा, आहार व शरीरास उपयुक्त सर्व पोषक घटक (हेल्थ सपलिमेंट्स) पुरवण्यात येतील.
या स्पर्धे नंतर होणार्‍या सांस्कृतीक कार्यक्रमांतर्गत भारतीय  शरीर सौष्ठवपटू महिला श्वेता राठोर, सुझेन बर्नेट्, भारतीय चित्रपट अभिनेत्री यांना स्त्रीशक्ति पुरस्कार तर सूत्रसंचालक व अभिनेता  रणविजय सिंग आणि जेष्ठ अभिनेते रणजीत यांना अनुक्रमे युथ आयकॉन व एवरग्रीन स्टाइल आयकॉन  हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी खास पाहुणे म्हणून आलेल्या रॉनी कोल्मन आणि खलि द ग्रेट यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडेल. सिनेसृष्टीतील कलाकारांचे नृत्यविष्कार हे सुद्धा या सोहोळ्याचे खास आकर्षण असणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रॅविटी जिम चे संस्थापक मिहीर कुलकर्णी यांनी केले असून हा कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुला आहे.


 
Top