माळशिरस येथे अखंड हरीनाम सप्ताह सांगता समारंभ उत्साहात
माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्यूज) :-
दिनांक ९ एप्रिल पासून माळशिरस येथे सुरु झालेल्या अखंड हरीनाम साप्ताह वर्ष ३७ वे सांगता समारंभ आज उत्सहात पार पडला . या निमित्ताने ह.भ.प. सदानंद गुरुजी यांचे शिष्य निम्बूत येथिल ह.भ.प. दत्तात्रय महाराज फरांदे यांचे सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन झाले . कीर्तनानंतर संत सोपान काका ट्रस्टचे कार्याध्यक्ष ह.भ.प. अंकुश बापू भगत यांचे हस्ते दहीहंडी फोडण्यात आली . यानंतर बोलताना ह.भ.प. फरांदे महाराज म्हणाले कि संपूर्ण महाराष्ट्रभर मृदुंगमणी म्हणून प्रसिद्ध असणारे विजय धर्माधिकारी यांचे सारखे व्यक्तिमत्व माळशिरस गावास लाभले आहे. याचा फायदा घेवून तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने वारकरी सांप्रदायात सहभागी व्हावे. यानंतर अखंड हरीनाम साप्ताह कमेटी व यात्रा कमेटी माळशिरस यांचे वतीने उपस्थित वारकर्यांना सन्मानित करण्यात आले.त्याच बरोबर साप्ताह काळात साथ देणारे ४ ते ८ वर्षाचे बाल वारकरी अथर्व मिटकरे,वेदांत गुरव,यश गायकवाड,स्वप्नील यादव,या चिमुकल्यांचा देखील भुलेश्वर प्रासादिक दिंडीचे संस्थापक व अखंड हरीनाम सप्ताहाचे व्यवस्थापक ह.भ.प.लक्ष्मण महाराज यादव यांनी सन्मान केला व पुढील वर्षी लहान मुलांनी जास्तीत संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.कारण अशा लहान वयातच संस्कार घडले जातात.यानंतर उपस्थित वारकरी व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाचे आयोजन अरुण सर यादव व भानुदास माने मित्र परिवाराच्या वतीने करणेत आले होते.
(प्रतिनिधी - विनय गुरव)