संगमनेर ( पुणे सुपरफास्ट न्यूज ) - येथील एका शेतकऱ्याची जमीन पठारभागातील बबन रेवजी सानप
(रा.दरेवाडी) याने खरीदी करत बेकायदेशीर करारनामे करत जास्त रक्कम वसूल
केल्याने त्याच्या विरोधात सहायक निबंधक कार्यालय संगमनेर यांनी घारगाव
पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४
कलम ३९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हिवरगाव
पठार येथील सिताराम रभाजी वनवे या शेतकऱ्याने वित्तीय संस्थेकडून कर्ज
उपलब्ध न झाल्याने दि २०/१२/१० रोजी बबन रेवजी सानप यांच्या कडून ५%
व्याजदराने ७५००० घेतले होते काही दिवसांनी सानप यांनी मुद्दल व व्याजाची
मागणी वनवे यांच्या कडे मागणी केली असता रक्कम उपलब्ध नसल्याने पैशाच्या
हमीपोटी हिवरगाव पठार येथील वनवे यांच्या मालकीची गट नंबर १९७/2 मधील १६ आर
मिळकत 1 वर्षीच्या मुदतीकता रु १३२००० ऐवजी घेतल्याचा मजकूर स्टँम्पवर दि
2/2/२०१२ रोजी लिहिला व वनवे यांनी ती रक्कम एक वर्षाचे आत न दिल्यास व एक
दिवस जरी जादा झाला तरी सानप यांना रु.२६४००० द्यावे असा मजकूर लिहून करार
नामा करत खरेदी खत केले.
वर्षभराच्या
मुदती नंतर जुलै २०१३ रोजी सानप यांनी ही शेतजमीन मूळमालक वनवे यांना
खरेदी खताद्वारे १३२००० रु रोख घेत परत दिली.यावेळी मुदतीत व्यवहार न
केल्याबद्दल १३०००० रुपयाचा सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचा चेक नं.००७८६६ वनवे
यांच्या कडून घेऊन सानप यांनी साकुर शाखेत स्वताच्या खात्यावर वटवला
बेकायदेशीर सावकारीच्या हेतूने जास्तीची रक्कम वसूल केल्याचे निदर्शनास
आले.
या
बाबतची तक्रार सिताराम रभाजी वनवे यांनी जिल्हा उपनिबंधक अहमदनगर यांच्या
कडे दि ०६/०२/२०१४ रोजी दाखल केली.दरम्यान सहायक निबंधक कार्यालयाने
केलेल्या चैकशी मध्ये बेकायदेशीर सावकारी करण्याच्या हेतूने करारनामे
केल्याचे सकृतदर्शनी दिसून आलेअसून मुंबई सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९
अन्वे बेकायदेशीर सावकारी करत असल्याचे सहायक निबंधक कार्यालचे मुख्य लिपिक
संजय पाटील यांच्या फिर्यादी वरून घारगाव पोलीस ठाण्यात दि 2 एप्रिल रोजी
गुन्हा दाखल होऊनही अद्यापही सावकाराला अटक करण्यात आले नाही.या बाबत
घारगाव पोलिसांच्या कामगिरी विषयी उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.
( प्रतिनिधी - नितिन शेळके )