राजुरी-दि २२ -(पुणे सुपरफास्ट न्यूज) - 
    गेल्या काही  दिवसा  पासून जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात शेतकरी आणि पशुपालन व्यवसायाला दुष्काळाबरोबरच बिबट्याच्या दहशतीचा देखील सामना करावा लागत आहे.
          जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील राजुरी गावच्या डोबी- डुंबरेमळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एकाचवेळी तीन शेळ्या ठार.
       राजुरी येथील सुदाम सावळेराम औटी या अपंग शेतकऱ्याचा शेती पालनाचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या रात्री अचानक शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने ओटी घराच्या बाहेर आले असता त्यांना समोर गोठ्यात बिबट्या व त्याच्या बाजूला त्यांच्या तीन शेळ्या मृत अवस्थेत दिसल्या त्यांना पाहताच बित्याने तिथून धूम ठोकली.
                   गेल्या काही दिवसान पासून झालेल्या बिबट्याच्या हल्यांचा थोडासा तपशील
       १) बेल्हा परिसरातील रानमळा येथे तरुण महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात ठार 
       २) पिंपरी पेंधर येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाई जखमी 
       ३) वडगाव आनंद येथे शेल्यावर हल्ला 
       ४)पिंपळवंडी  येथे शेळीच्या कळपावर हल्ला 
       ५) मंगरूळ  पारगाव येथे एका महिलेवर हल्ला तसेच त्याच दिवशी एका शेतकऱ्यावर हल्ला 
       ६) आणे परिसरात शेळ्या तसेच  पाळीव प्राणांवर हल्ला       
       ७) राजुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार 
                 अशा अनेक प्रकारच्या बिबट्याच्या हल्लाय्च्या घटना घडल्या आहे.
     दुष्काळग्रस्त परस्थिती असताना आहे त्या मुबलक पाण्यावर शेतकरी शेती करतात शेती साठी पाणी भरण्यासाठी  जाने म्हणजे आज घडीला शेतकऱ्याचा जीवावर बेतणारा प्रश्न झाला आहे कारण असणार्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी खूप हैराण  झाले आहेत शेतीला पाणी पुरवठा झाला नाही तर शेतकरी शेती करू शकत नाही आणि शेतला पाणी पुरवठा करवा तर बिबट्याची भीती त्या मुळे शेतकऱ्यांपुढे शेती करणे हा एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
         एकीकडे बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून वनविभाग या सर्व प्रकारात वनविभाग अपयशी का असा एक प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.(प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे)
 
 
 
Top