माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
                    पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील पिसर्वे येथील तंटामुक़्त गाव समिती च्या अध्यक्ष पदी पिसर्वे गावचेे माजी उपसरपंच मच्छिंद्र गजानन कोलते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पिसर्वेचे तंटामुक़्त गाव समिती अध्यक्ष बबन पांडुरंग कोलते यांच्या निधानामुळे हे पद रिक्त झाले होते.
            आज पिसर्वे ग्रामपंचायतीच्या  विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदाचा विषय घेण्यात आला. मच्छिंद्र कोलते यांनी यापुर्वीही हे पद भुषवले होते.त्यावेळी गावातील अनेक वाद गावातच मिटवले होते.गावातील दारुचा विषय सर्वप्रथम हातात घेऊन दारुबंदीसाठी विशेष काम केले होते.आदर्श गाव संकल्पना राबवुन तंटामुक्ती गाव बनवण्यासाठी विशेष काम केले. गावच्या सामाजिक कार्यात विशेष आवड असल्याने त्याची आजच्या ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच संभाजी कोलते ,पिसर्वेच्या सरपंच लक्ष्मी वाघमारे, उपसरपंच सुनिल कोलते, सदस्य नितिन वायकर, शालन कासवेद, विकास कोलते, माजी उपसरपंच दत्तानाना कोलते, रघुनाथ कोलते, संभाजी कोलते, संजय कोलते, रविन्द्र कोलते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          मछिन्द्र कोलते यांनी पिसर्वे गावचे उपसरपंच पद ही भूषवले आहे. यापूर्वी त्यानी सलग दोन वर्ष तंटामुक्ति अध्यक्ष म्हणून काम केले असुन त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गावात तंटामुक़्ती साठी मोठे काम केले होते. त्याच्या कार्यकाळात गावाला पारितोषिक देखिल मिळाले होते .
     त्यांच्या या निवडीबद्दल जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, शांताराम बापू कोलते, यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अभिनंदन केले.
 (प्रतिनिधी - विनय गुरव)


 
Top