पुरंदर तालुका गुरव संमाजाकडून पुरंदर तहसीलदार श्री संजय पाटील यांना निवेदन
माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
समाजात अंधश्रद्धा पसरविली जात असल्याचे कारण पुढे करत काही राजकीय पक्ष व संघटनांनी विरोध दर्शविल्याने चर्चेत आलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेवर आता पुरंदर तालुक्यातील गुरव समाजाने आक्षेप घेतला आहे ता समाजाने एकत्र होत मालिकेत गुरव समाजाचे चुकीच्या पद्धतीने बदनामीकारक होत असलेले चित्रीकरण थांबवण्यात यावे आशी मागणी असणारे निवेदन तहसीलदार पुरंदर यांच्या कडे दिले या मालिकेतून कोकणात भुताटकी आहे असे भासवून खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचा आरोप करीत काही राजकीय पक्ष व संघटनांनी काही दिवसांपूर्वी या मालिकेला विरोध दर्शविला होता. तसेच मालवणी भाषेबाबत सुधा आक्षेप घेतला होता त्यामुळे हि मालिका चांगलीच चर्चेत आली होती नंतरच्या काही काळात हा आक्षेप मावळला तोच मालिकेतील असणार्या गुरव व्यक्तिरेखे बद्दल तालुक्यातील गुरव समाजाने आक्षेप असल्याचे निवेदन पुरंदर तहसीलदार याना देवून आपल्या भावना व्यक्त केल्या.
निवेदानात म्हंटले आहे कि सदर मालिका अंधश्रद्धा पसरविणारी भयावh मालिका असून ती पूर्ण पाने भाताखेतन वर आधारित आहे.
त्या मालिकेत गुरव व्यक्ती रेखा अत्यंत चुकीच्या पद्धतीने साकारली आहे गुरव म्हणजे धार्मिक ठिकाणी प्रामाणिक पाने परंपरागत देव पूजा करणारा पुजारी मात्र या मालिकेत गुरव व्यक्तिरेखेचे चित्रण अत्यंत चुकीचे केले आहे म्हणजेच देवळातील गुरव भगत असून तो भाविकान मध्ये अंधश्रद्धा पसरवितो कर्णी, बाधा करतो,, सोडवतो जे भाविक गुरावाकडे देवाच्या कारणास्तव जात नाही किवा जे अंधश्रद्धा मानत नाही आशा संबंधित भाविकानवर देव घालणे त्यांच्यावर लिंबू नारळाचे उतारे चढविणे असे प्रकार करून भाविकानास देवाची भीती दाखविणारा भक्ताना लुबाडणारा आसा गुरव या प्रकारचे चित्रीकरण करून गुरव जातीची बदनामी केली आहे
समस्त गुरव समाजाच्या भावना दुखविल्या गेल्या असून असंतुष्टाचे वातावरण निर्माण झाले आहे वास्ताविक याचा परिणाम कष्टप्रत जीवन जगणार्या ग्रामीण गुरवाना सर्व सामान्य जीवनात इतर जाती धर्मातील समाजाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे तरी संबधित मालिकेतील गुरव व्यक्तिरेखा त्वरित बंद करावी तसेच अंधश्रद्धेच्या गोष्टी पसरविणारे प्रसंग सुधा काडून टाकावेत
यावेळी गुरव समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सुजाता गुरव व विनय गुरव यांच्या हस्ते तहसीलदार पुरंदर याना निवेदन दिले
यावेळी गिरीश आगलावे राजेंद्र गाडेकर निलेश गाडेकर गोपी आगलावे प्रशांत भैरवकर मोहन भैरवकर नारायण भैरवकर महेह गुरव व मोठ्या संखेने तालुक्यातील गुरव समाज उपस्थित होता. (प्रतिनिधी - विनय गुरव)
