आळेफाटा (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
               तिथी प्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्ताने शिवनेरी गडावरून शिवज्योत घेवून येताना आळे तसेच राजुरीतील युवकांच्या रेलीचा  अपघातात  ५ गंभीर तर ४ किरकोळ जखमी  .
                तिथी प्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्ताने शिवनेरी गडावरून शिवज्योत घेवून येताना आळे तसेच राजुरीतील युवकांच्या रेलीला एका चार चाकी गाडीने जोरदार धडक मारल्याने रेली मधील मोटारसायकलींवर आदळली नंतर समोर असणाऱ्या रिक्षा वर आदळली त्यामुळे रेलीतील अनेक तरुण जखमी झाले 
              त्यापैकी समीर गायकवाड,सीताराम जेडगुले ,सचिन बनकर ,कैलास हाडवळे ,हर्षद खंडागळे हे गंभीर जखमी असून शुभम औटी ,अनिकेत वाकळे ,संदीप फावडे ,सुनील फुलमाळी हे किरकोळ जखमी असून जखमींना तातडीने आळेफाटा येथील कोकणे हॉस्पिटल तसेच धांडे हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येत आहेत .
                 चारचाकी व्हर्ना हि आर्वी पिंपळगाव येथील वाहन असून चालक गौतम लोखंडे यांस  अटक.(प्रतिनिधी- केदारनाथ बारोळे)


 
Top