माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्युज) :-
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वरी आज सुर्यदेवाने सकाळी भुलेश्वराचे
दर्शन घेतले.शिवलिंगावर सुर्याचा किरण पडल्याने शिवलिंग सोनेरी दिसु लागले. हा योग विलक्षण असल्याने
भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
आज सकाळी सुर्योदयाच्या वेळेस किरणोत्सव पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली
होती.दरवर्षी मार्च महिन्यामध्ये २८ मार्च रोजी भुलेश्वर मंदिरात किरणोत्सव होतो परंतु यावर्षी लीप वर्ष
असल्यामुळे म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असल्यामुळे दिनांक २७ मार्च रोजीच किरणोत्सव
सोहळा झाला .आज किरण थेट पिंडीवर गेले. यावेळी ६ वाजून २० मिनिटा पासून ६ वाजून ३८ मिनिटा पर्यंत
सरासरी १८ मिनिटे श्री भूलेश्वारास सूर्य किरणांच अभिषेक झाला हा किरणोत्सव चालू असताना भाविकांनी
ॐ नम: शिवाय जप करून मंदिर परिसर भक्तिमय केला होता .यावेळी श्री भुलेश्वर देवस्थानचे पुजारी
विजय गुरव यांनी सांगितले की मार्च महिन्या व्यतिरिक्त सप्टेंबर महिन्यात सुद्धा सुर्यकिरण पिंडीपर्यंत
येते. हा दुर्मिळ योग दोन वर्षापूर्वी आला होता .यापुर्वी २००२ साली असा योग आला होता.त्यानंतर प्रत्येक
वर्षी सप्टेंबर महिन्यात सुर्यकिरण पिंडीवर पडलेच नाही .
नगारखान्या पासून शिवलिंग सरासरी १०० अंतर व यामध्ये नगरखाण्यावरील भिंत नंदीच्या मागील खिडकी ,
नांदी ची मान ,असे विविध अडथळे पार करून सूर्यकिरण शिव लिंगा पर्यंत जाते .हे एक भारतीय वस्तू
कलेतील विशेषच मानावे लागेल .
यावेळी किरणोत्सव पाहण्यासाठी भुलेश्वर ,माळशिरस,कासुर्डी अशा परिसरातील भाविकांनी गर्दी केली
होती.(प्रतिनिधी - विनय गुरव).