माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्यूज )- 
                           पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील नायगाव येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे.गावात आगोदर पाणी द्यावे व नंतर पाण्याचे महत्व सांगावे अशा शब्दात नायगाव ग्रामस्थांनी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या अधिका-यांना खडसावले. नायगाव येथे जलबचती विषयी जनजाग्रुती व पाणी बचतीचे महत्व यासंदर्भात बैठक घेण्यात आली.यावेळी नायगाव ग्रामस्थांनी दुष्काळी परीस्थीतीच्या अनेक व्यथा मांडल्या. नायगावच्या तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष विलास खेसे म्हणाले कि दिवसेनदिवस ग्रामस्थांना दुष्काळी परीस्थीतीशी अधिक सामना करावा लागत आहे.गावातील अनेक महीला, पुरुष गावात काम नसल्याने बाहेर कामाला जातात. जनावरांना चारा व पाणी नाही.यासाठी जनावरांना चारा व पाणी मिळावे. त्याचप्रमाणे गावातील तलाव मोफत भरुन देण्यात यावे. अशा विविध समस्या मांडल्या.
यावेळी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शाखा अभियंता साहेबराव भोसले, नायगावच्या सरपंच दिपाली जगताप,ग्रामसेवक धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चौंडकर,अनिल शेंडगे, उत्तम ठवाळ,मंगल मेमाणे,मंदाकिनी कड, सोपानकाका सहकारी बँकेचे संचालक मारुती पाटोळे,गणपत कड, प्रवीण जगताप,शिद्धनाथ खेसे,रामचंद्र खेसे,जयराम खेसे,परीसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.(प्रतिनिधी- विनय गुरव )

 
Top