राजुरी (पुणे सुपरफास्ट न्युज)-
सकाळची ९.३० ची वेळ.....आळेफाटा बसस्थानक पूर्णपणे गजबजलेले ..त्याच दरम्यान पोलिसांच्या गाड्या अन त्यामधील पोलिसांची धावपळ सगळीच परस्थिती भयंकर या घटनेने देखील बसस्थानकातील नागरिकांची पळापळ आन बॉम्बची बाग असल्याच्या चर्चेने आळेफाटा बसस्थानक ,पोलिसांची आणि बॉम्ब शोधक पथकाने ताब्यात घेतलं मात्र नंतर काही तासाने हे पोलीस "मोकड्रील " असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला.

याबाबत अधिक समजलेली
माहिती अशी कि आळेफाटा पोलीस ठाण्यात सकाळीच एक निनावी फोन ने आळेफाटा
बसस्थानकात एक बेवारस सुटकेस आढळून त्यामध्ये बॉम्ब असल्याची खबर दिली
त्यानंतर आळेफाटा पोलीस व त्यामधील सर्व कर्मचारी तसेच तालुक्यातील
जवळपासच्या ठाण्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी घटना स्थळी धाव घेतली.
या चर्चेने संपूर्ण आळेफाटा परिसरात नागरिकांची धांदल उडून मोठ्या
प्रमाणात घबराट निर्माण झाली होती. तसेच या मध्ये बहुतांशी " बघ्याची गर्दी
अन हौशी नावशी लोकांच्या चर्चेला उधान आले होते". त्याच दरम्यान आळेफाटा
पोलीस ठाण्याचे पी.आय. क्रांतीकुमार पाटील ,एपी आय यांनी सर्व परिस्थिती
गांभीर्याने हाताळून बी.दि. एस. पथकाला फोन करून पुणे येथून बोलून घेतले
तोपर्यंत आळेफाटा बसस्थानकालगत महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली वाहतूक
खोळंबली होती त्याच दरम्यान वाहनाची कसून तपासणी केली जात होती
उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्रीताई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व
पथके कार्यरत होती.शेवटी श्वान पथकाने कसून चौकशी केली असता या ब्यागमध्ये
कुठल्याही प्रकारचे स्फोटक पदार्थ आढळून आले नाही .असे समजताच परिसरातील
नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला .कालांतराने आळेफाटा पोलिसांनी हा सर्व
प्रकार भविष्यात कुठल्याही अशा प्रकारची घटना घडू नये आन घड्ल्यास काय दक्षता
घेतली पाहिजे याबाबत चे हे मोकड्रील होये असे सांगितले. (प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे)