पुणे (पुणे सुपरफास्ट न्युज):
            पुण्याच्या निर्मिती या सेवाभावी संस्थेने उस्मानाबाद इथील येवती या गावातील दुष्काळ भागात लोकवर्गणीतून गोळा केले ६५०० किलो धान्य,३५ तेलाचे डब्बे,  देशाच्या बळीराजाच्या हाती सुपूर्द केले.आणि त्याच बरोबर या गावातील दुष्काळ ग्रस्त शेतकर्यांच्या मुलांसाठी चालत असलेल्या शाळेला देखील शालेय साहित्य या निमिताने देण्यात आले.ऐकीकडे देशात आज दुष्काळाने थैमान माजल असताना निर्मिती सारख्या संस्था शेतकर्यांचा आधारवड होण्याचा प्रयत्न करत आहेत.देशातले तरुण आज बेजवाबदार आहेत,त्यांना वास्तवाच भान नाही, अशी टीका करणाऱ्या सगळ्यांच निर्मिती सारख्या तरुणांच्या या संस्थेने तशी सणसणीत चपराक दिली.देशाच्या बाळीराज्याच्या पाठीमागे खंबीर पाने उभा राहिलेल्या या तरुणांन कडे पाहिल्यावर देशाच्या भवितव्याची चिंता वाटत नाही हे हि सत्य या निमिताने दिसत आहे या तरुणांनी जवळ जवळ एक महिना या उपक्रमासाठी मुठी मुठी धन्य गोळा केला यात त्यांना संदीप कस्पटे,सुजित काळभोर,निखील लोहार,अखिल ज्ञानदीप मित्र मंडळ,श्री गणेश मित्र मंडळ,आशय अनेक तरुण मंडळानी साथ दिली या निमिताने बोलताना या संस्थेचे मुख्य शुभम बागडे म्हणाले कि, “येवती गावातील परिस्थिती पाहिल्यानंतर रोज अन्न खाताना स्वताची लाज वाटायला लागली कि आपल्याला दोन वेळच जो खाऊ घालतो तोच आज उपाशी आहे म्हणून आम्ही ठरवल कि आता या  शेतकर्यांचा पाठीशी उभा राहुया म्हणून हा उपक्रम आम्ही हातात घेतला”गर्जा सह्याद्री न्यूज व पुणे सुपर फस्ट न्यूज  ने देखील या उपक्रमास हातभर दिला.
(प्रतिनिधी:ज्ञानेश भुकेले)         

 
Top