माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
मातृ पितृ प्रतिष्ठानचे ( कोथरुड,पुणे ) अध्यक्ष मा.श्री.प्रदिप सपकाळ , संचालिका सौ. राजश्री सपकाळ यांच्या मदतीतुन न्यु इंग्लिश स्कुल गुरोळी ,ता . पुरंदर विद्यालयातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल खोदुन देण्यात आले.  या बोअरवेलला भरपुर पाणी लागले असुन सदर बोअरवेलचा जलपुजन समारंभ व देणगीदारांचा कृतज्ञता सोहळा विद्यालयात शनिवार दि . १२ मार्च २०१६ रोजी पार पडला.
       या प्रसंगी बोलताना आई वडिलांची सेवा हिच ईश्वर सेवा असल्याचा संदेश श्री कुंडलीक मेमाने सर यांनी दिला.ज्ञानदाना इतकेच जलदानाचे महत्व अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज खेडेकर यांनी विशद केले.
       तसेच आधुनिक जगात आई वडिलांच्या आठवणी ठेवुन समाजकार्य करणारे लोकच खरे पुण्यवंत असल्याची भावना प्रास्ताविकात मुख्याध्यापक रामदास जगताप यांनी व्यक्त केली.
    आई वडिलांच्या कृपेशिवाय माणुस नाही हा विचार श्री सपकाळ यांनी मांडला या कार्यक्रमासाठी मातृ पितृ प्रतिष्ठानचे ( कोथरुड,पुणे ) अध्यक्ष मा.श्री.प्रदिप सपकाळ , संचालिका सौ. राजश्री सपकाळ ,सौ.वनिता प्रभु, राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक कुंडलीक मेमाने , गावचे सरपंच रामचंद्र खेडेकर, संपत खेडेकर, माऊली मेमाने, गोरख खेडेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
      या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ह.भ.प. तुकाराम महाराज खेडेकर यांनी भुषविले. विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास जगताप यांनी प्रास्ताविक केले. विद्यालयातील विद्यार्थ्यीनींनी ईश स्तवन आणि स्वागतगीत सादर केले. सचिन घोलप यांनी सुत्र संचालन केले तर अरुण यादव यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी - विनय गुरव)



 
Top