मी अनुभवलेले एस.एम...
मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन 6 जुनला "भोसरी" इथं होतं .राज्यभरातून विविध पत्रकार या अधिवेशनासाठी येणार होते आणि नुकतीच काही दिवसांपूर्वी मी पत्रकारितेला सुरुवात केली होती..मग ठरवलं.आपणसुद्धा त्या अधिवेशनात जायचं आणि पत्रकारांच्या विचार मेळाव्याला जवळून अनुभवायचं..ठरल्याप्रमाणे मी अधिवेशनाला गेलो ..राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस उद्घाटनाच्या सत्राला उपस्थित होते ..त्यांच्या उपस्थितीत पत्रकार बांधवांचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने मांडताना एस.एम देशमुख साहेबांना मी पहिल्यांदा पाहिले आणि एस.एम नावाचं वादळ मला अनुभवता आलं आणि सलग दोन दिवस मला एस.एम जवळून पाहता आले .या अगोदर विरोधात बातमी केली म्हणून माझ्या राहत्या घराच्या गेटची तोडफोड झाली होती , अनेकांनी विविध प्रकारे माझ्यावर दबाब टाकण्याचा प्रयत्न केला मात्र बातमी करताना मी कधीच कुणालाच न जुमानता थेट अचूक आणि बिनधास्त बातमी लावली आहे ,मात्र अधिवेशनानंतर बातमीमुळे माझ्या अंगाला जरी धक्का लागला तरी माझ्यासोबत महाराष्ट्रभरातील पत्रकार बांधव , मराठी पत्रकार परिषद आणि एस.एम,देशमुख नावाचं वादळ असेल...त्यामुळे आता घाबरायचं नाही,आपण निर्भीड पत्रकारिता करायची हीच प्रेरणा मला त्या अधिवेशनातून मिळाली.खरंतर पुरंदर तालुका पत्रकार संघ ,जेजुरी शहर पत्रकार संघ सुद्धा माझ्या आधीच्या काळात सोबत होतेच ,आणिऑगस्ट महिन्यात आम्ही आयोजित केलेल्या “सन्मान पुरंदरच्या रत्नांचा” या कार्यक्रमास देशमुख साहेब जेजुरीतही येणार होते मात्र काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही .दरम्यान माझी स्थानिक वृत्तवाहिनी “गर्जा सह्याद्री” च्या उद्घाटनासाठी एस.एम. देशमुख साहेबांनी यावं याचं नियोजन चालू होतं मात्र त्या वेळी सुद्धा परिषदेचा मुंबईत कार्यक्रम असल्याने तो योगही काही जुळून आला नाही .पण म्हणतात ना आपण आपलं काम करत रहावं ,मोठ्या मनाची मोठी माणसं आपल्या पाठीशी नक्की उभं राहतात..मला याची प्रचिती आली ..काही दिवसांपूर्वी मी “जय महाराष्ट्र” वृत्त वाहिनीवर महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या विश्वस्ताच्या बाबत “हे कसले खंडोबा देवाचे विश्वस्त?” अशा प्रकारची बातमी केली , बातमी पाहिल्यानंतर एस.एम.देशमुख साहेबांचा मला कॉल आला ,साहेब म्हणाले “निलेश तुझी बातमी पाहिली..अशाच बिनधास्त न घाबरता बातम्या करत राहा आम्ही तुझ्या सोबत आहोत” या त्यांच्या शब्दांनी विलक्षण आनंद तर झालाच आणि काम करण्यासाठी मोठं बळही मिळालं.माझ्यासारखा 23 वर्षांचा तरुण नुकतीच पत्रकारितेला सुरुवातच करत असताना एस.एम.देशमुख साहेबांसारखा मोठा माणूस कौतुक करतो ना , तेव्हा कामाला उभारी मिळते आणि उत्साह वाढतो. शरदाचं चांदणं डोक्यावर असल्याने बारामतीकरांनां उन्हाचे चटके बसत नाहीत म्हणे, खरं खोट माहित नाही , मात्र एक नक्कीच खरं आहे “जो पर्यंत एस.एम नावाचं छत्र आम्हा पत्रकार बांधवांच्या डोक्यावरआहे तो पर्यंत पत्रकारांच्या तख्ताला कोणीच चटके देऊ शकत नाही , ती हिंमत कुणातही नाही ..माझ्यासारखी 22 – 23 वर्षाची तरुण मुलं पत्रकारितेला ध्येय मानून पत्रकारितेत येताहेत , निर्भीडपणे प्रामाणिकपणे बातम्या करताहेत या सगळ्यांना आम्ही तुमचेच आहोत हे एस.एम देशमुख साहेब सांगतात ..मात्र खरं सांगु का ? साहेबांनी हे सांगितलं जरी नाही तरी “देशमुख साहेब आमचेच आहेत ,आमच्या पाठीशी आहेत .हे प्रत्येक पत्रकाराला वाटावं.. इतकं अतुट नातं देशमुख साहेबांचं आम्हा सर्व पत्रकार बांधवांसोबत आहे..खरंतर एस.एम.हे आम्हा पत्रकारांचे आधारवड आहेत.मी आजवर एस.एम.देशमुख साहेबांशी प्रत्यक्ष भेटून कधीच बोललेलो नाही.. मात्र लवकरच पुण्यातील अधिवेशात त्यांची भेट होईल आणि व्हावी ही माझी प्रांजळ अपेक्षा आहे..कारण काही माणसांच मोठेपण त्यांना प्रत्यक्ष न भेटताही अनुभवता येतं.देशमुख साहेबांच्या किर्तीचा सुगंध तर चौफेर दरवळतो आहे.जितका त्यांच्यातला पत्रकार सच्चा आहे ..तितकाच माणूसही सच्चा आहे...शेवटी इतकच की..एस.एम.पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.............
निलेश जगताप ( पञकार, व्याख्याते )
सहजसंपर्क - 8390530629