राजुरी (पुणे सुपरफास्ट न्युज) -
             पुणे नाशिक महामार्गावर आळे फाटया जवळ एका मालवाहतूक ट्रक ने दुचाकीला जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृ त्यू झाल्याची घटना दि  ०७  रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली    
         अधिक माहिती देताना आळेफाटा पोलीस ठाण्याचे स .पो.निरिक्षक कदम सो.यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे -नाशिक महामार्गावर नाशिक कडून भरधाव वेगाने मालवाहतूक ट्रक क्र . एम.एच .१६ ए ई ७५३७ या ट्रक चालकाने बेजबाबदारपणे समोरून येणाऱ्या दुचाकीला एम .एच .१४ पी १०४५ या दुचाकीला समोरासमोर जोरात धडक दिल्याने या दुचाकीवरी ल अजय सुरेश जाधव ( २२ ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला 
       अधिक माहिती अशी कि अजय जाधव हा करू.ऊ. बाजारसमिती आळेफाटा येथे हमालीचे काम करत होता आणि दि-०७ च्या रात्री कामावरुन घरी जात असताना हि घटना घडली असून त्याच्या मागे एक लहान भाऊ एका लहान बहिण पत्नी आणि सहा मण्याची मुलगी असून त्याला आई वडील नाहीत त्यामुळे या घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. (प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे )


 
Top