सासवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे जन्म झालेल्या पुष्पा बारावकर , त्यांचे 12 वी पर्यन्तचे शिक्षण बालपण ही कोपरगाव येथे
झाले ,त्यानंतर प्रमोद बनकर यांच्या बरोबर 2001 ला त्या विवाहबध्द झाल्या आणि पुष्पा
बारवकर लग्नानंतर पूनम बनकर या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या , आपले वैवाहिक
जीवन अगदी सुखात आनंदात व्यतीत करना-या पूनम बनकर यांचे सुख कदाचित नियतीला पाहवले
नाही आणि दुर्दैवीरित्या 30 नोव्हेंबर 2011 ला प्रमोद बनकर यांच हृदयविकाराने निधन झाले , त्यावेळी
पूनम बनकर या अवघ्या 27 वर्षांच्या होत्या सोबत त्यांचा प्रिंस हा मुलगा
फक्त चार वर्षांचा होता.
आपल्यावर आलेले एवढे मोठे दुःख? पुढील जीवन कसे जगायचे? मुलाचे शिक्षण? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभे राहिले , मात्र अशाही परीस्थितीत दुःखाला हृदयात दफन करून आपले शिक्षण पुढे चालु ठेवण्याचा निर्णय उराशी ठेऊन पुणे युनिवर्सिटीमधुन त्यांनी बी कॉम चे शिक्षण सुरु केले. 2014 ला त्यांनी आपले बी. कॉम. पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करत असताना पूनम बनकर यांनी आपले सासर कोळविहीरे सोडले व सासवड येथे सुवर्ण नगरीत आपले वास्तव्य सुरु केले पोटाचे खळगे भरण्यासाठी त्यांनी तहसिल कार्यालयात पुरवठा विभागात दोन वर्षे काम केले.
तत्कालीन तहसिलदार सीमा होळकर यांची ओळख झाल्यानंतर तहसिलदार सीमा होळकर यांचे व त्यांचे पति किरण होळकर यांचे मार्गदर्शन पूनम बनकर यांना मिळाले व त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग दिसेल तीच म्हण पुढे आली , त्यांनी सासवड येथील सावली फाउंडेशनचे सायली धनाबाई व उमेश कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला अभ्यासास सुरुवात केली. 07 जून 2015 रोजी टॅक्स असिस्टंटची परीक्षा दिली व शेवटी तो आनंदाचा दिवस उजेडास आला आणि 02 फेब्रुवारी 2016 रोजी परीक्षेचा निकाल लागला व त्यात पूनम बनकर यांनी घवघवित यश मिळविले व प्रिंसला तुमच्या मागे कसले ही दुःख पाहू देणार नाही त्याचे संगोपन करण्यासाठी मी आपल्या जीवाचे रान करीन हे पतीला दिलेले वचन सुध्दा पूर्ण केले. शेवटी हेच म्हणावे लागेल माँ तुझे सलाम......