राजुरी (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
                         गेल्या काही दिवसापासून जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील पिंपळवडी, आळेफाटा, राजुरी, पिंपरी-पेंढार,बेल्हा,आणे,मंगरूळ या परिसरातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शेती व्यवसाय,दुध व्यवसाय आणि त्याच बरोबर मेंढपाळ व्यवसाय यांवर मोठ्या प्रमामात प्रभाव पडत असून या सर्व व्यवसाय नुकसानीत चालले आहेत..बिबट्यांच्या या हल्याचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी आणि  नागरिकांचे प्राण धेखील धोक्यात येत असून बिबट्याना पकडण्यासाठीचे अयशस्वी पर्यटन मुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..
     अशातच दि-०७   रोजी पहाटे पिंपळवंडी शिवारातील कालेकरवाडी  येथे  पहाटे ३ च्या सुमारास दादाभाऊ आबू चितळकर रा.साकुर मांडवे ( संगमनेर )  या मेंढपाळाच्या मेंढ्यांचा कळपावर मोकार आणि मोकाट सुटलेल्या बिबट्याने हल्ला करून त्या कळपातील एका मेंढीचा आणि एका बोकड याचा  प्राण घेत ठार  केले मेंढ्यांच्या ओरडण्याने चितळकर यांचा मुलगा विशाल दादाभाऊ चितळकर याला जाग  आली  परंतु तोपर्यंत बिबट्याने मेंढी आणि बोकड यांचा परदाफाश केला आणि पळून गेल्याने चितळकर यांचे फार मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले आहे.
         अशा अनेक प्रकारच्या घटना जुन्नर तालुक्यात दररोज होत असून वनविभागाने या सर्व गोष्टीची गांभीर्याने दाकाहाल घ्यावी अशी मनापासून तळमळ शेतकरी आणि नागरिकाकडून व्यक्त होत आहे.
(प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे)
 
 
 
 
 
Top