तैवान (वृत्तंस्था - पुणे सुपरफास्ट न्यूज) -
             तैवानमधील भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या २४ झाली असून, उंच इमारतींचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे. आणखी काही लोक जिवंत असतील तर त्यांना बाहेर काढले जात आहे. दक्षिण तैनान शहरात भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे.
तैनान या शहरात आपत्कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात आले असून, १७१ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. काल पहाटे ६.४ रिश्टरचा हा भूकंप झाला होता. तैनानचे महापौर लाय चिंग ते यांनी सांगितले, की १२४ लोक अजूनही ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे, पण ते तळाशी असावेत. लोकांनी दिलेल्या माहितीवरूनच इतर काही लोकांना वाचवण्यात आले आहे. आठमजली इमारतीतील रहिवासी हुआंग ग्वांग वे यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले.


 
Top