पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - काल रात्री कोथरूड डेपोजवळ एका बिल्डिंगमधे चौथ्या मजल्यावरिल घरात सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की त्यामुळे घरातील भिंतीदेखील पडल्या व यामधे तेथील एका जेष्ठ नागरिक महिलेला दुखापतदेखील झाली.
परंतु , यादरम्यान अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहोचले व ते जिन्यातून जात असतानाच सिलेंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज झाला. पण त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले. पण त्यांच्यातीलच एक जवान संतोष भोसले खाली असताना चौथ्या मजल्यावरुन भिंतीचा काही भाग त्याच्या डोक्यात पडून तो जखमी झाला.
त्याचवेळी तेथे उपस्थित असणारे कोथरूड पोलिस ठाण्याकडिल पोलिस शिपाई संदिप
रिठे यांनी त्या दलाच्या जवानाला लगेचच उचलून स्थानिक नागरिक राहूल भरम व
कौस्तुभ वकिल यांच्या मदतीने उपचाराकरिता रूग्णालयात नेले. त्या पोलिसाने
दाखवलेल्या तत्परतेमुळे दलाच्या जखमी जवानाला लगेचच उपचार मिळू शकले व
पुढील अनर्थ टळला. या पोलिस शिपायाच्या तत्परतेलाच अग्निशमन दलाच्या
अधिकारी व जवानांनी मनपुर्वक आभार मानत सलाम केला आहे.