मुंबई (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
       राज्याच्या ग्रामीण भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात नेमके किती सेट टॉप बॉक्‍स हवे आहेत, हे केबल ऑपरेटरनी "एमएसओना (मल्टिसिस्टीम ऑपरेटर) कळवावे, असा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. 

या विषयावरील जनहित याचिकेची सुनावणी न्या. विद्यासागर कानडे व न्या. रेवती मोहिते ढेरे यांच्यासमोर झाली. सध्या राज्यातील 10 लाखांहून कमी लोकसंख्या असलेली शहरे व गावांत सेट टॉप बॉक्‍स लावले जात आहेत. केबल ऑपरेटर हे काम करत आहेत. पण "एमएसओकडून आम्हाला सेट टॉप बॉक्‍स मिळत नाहीत, असे केबल ऑपरेटरचे म्हणणे आहे. तर केबल ऑपरेटर आम्हाला नेमकी संख्या सांगत नाहीत, असा एमएसओचा दावा आहे. या वादातून हे काम रखडले आहे. वारंवार मुदतवाढ द्यावी लागत आहे. त्यामुळे खंडपीठाने वरील आदेश दिला.



 
Top