आळेफाटा ( पुणे सुपरफास्ट न्युज )  -    नगर कल्याण महामार्गावर बेल्हे गावाजवळील गुलुंजवाडी येथे दरोडे खोरांच्या टोळीने ट्रक आडवून त्यातील व्यापाऱ्यांना धार धार शस्त्र वापरून  आणि मिरचीपूडचा  देखील वापर  करून त्यांच्या जवळील एक लाख वीस हजार रुपये  रक्कम लांबवली  परंतु तर्क चालक आणि व्यापारी यांनी प्रसंगवधान राकःत त्या टोळीतील एका आरोपीस  पकडले आणि आळेफाटा पोलिसांच्या स्वाधीन केले आणिकृष्णा राजेंद्र चव्हान यांच्या फिर्यादीवरून  दरोड्याचा  गुन्हा दाखल केला आहे.
   अधिक माहिती देताना पो.नि. क्रांतीकुमार पाटील साहेब यांनी सांगितले  दि- ०४ रोजी पहाटे  १२.४५  सुमरास नगर कल्याण महामार्गावर फीर्यादी आणि नेवासा येथील  व्यापारी हे कल्याण कडे जात असताना आणे घाट  संपल्या नंतर  गुळूचवाडी  येथे त्यांचा ट्रक आल्यानंतर अचानक तीन   मोटार सायकलवर एकूण सहा   जन ट्रकच्या समोर त्यांच्या मोटार सायकल आडव्या लाऊन धार धार हत्यारांचा धाक दाखून ट्रक क्र एम.एच.१७- बी.डी.१७२६ हा तर्क अडून त्या चालकाला त्यांच्या जवळील हत्याराने जखमी केले त्याच प्रमाणे त्या ट्रक  मधील व्यापार्यांना दगड ,सत्तूर तसेच  मिरची पावडरचा वापर करून त्या ट्रक मधील  अश्पाक शेक आणि शंकर  ससे यांना बेदम मारहाण करत  त्यांच्या जवळील रोख रक्कम १२०,००० रु. घेऊन  जात असताना फिर्यादी आणि व्यापारी यांनी आरडा ओरडा केला असता ते सर्व आरोपी पळून जाण्याच्या तय्रीत असतंच अतिशय धासाने त्या टोळीतील एक आरोपी ओंकार सुरेश शेजवळ रा.भोसरी या आरोपींला त्यांनी पकडवून ठेवले आणि त्याला बांधून ठेवण्यात त्यांना यश आले परंतु बाकीचे सहा आरोपी पळून गेले.या सर्व प्रकारामध्ये असणारे आरोपी हे अंदाजे २५ ते ३० या वायोगातील आहे 
    या दरोड्यामधील जखमी ज्ञानदेव विठोबा ससे, शंकर ससे , अश्पाक शेक , यांच्यावर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार चालू आहे या व पुढील तपास स पो.नि. क्रांतीकुमार पाटील आणि पो. नि. म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
 ( प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे )
 
Top