आळेफाटा (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील असणाऱ्या ९ गावांचा पाणीपुरवठा दि-३१ पासून सदर ग्रामपंचायत यांनी थकबाकी न भरल्याने बंद करण्यात आला आहे.
जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील असणाऱ्या ९ गावांचा पाणीपुरवठा दि-३१ पासून सदर ग्रामपंचायत यांनी थकबाकी न भरल्याने बंद करण्यात आला आहे.
बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची
सप्टेंबर १५ पर्यंतची १ कोटी ३५ लाख रुपये थकबाकी न भरल्याने पूर्व भागातील
उंब्रज, खामुंडी ,पिंपरी पेंढार वडगाव आनंद आळे,
राजुरी,बेल्हे,गुळूचवादी,आणे,या गावांना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
सप्टेंबर १५ पर्यंतची थकबाकी या महिन्या अखेर पर्यत न भरल्याने अखेर
जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने या गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आली
अशी माहिती उ.ब. करंजकर यांनी दिली सोबतच करंजीकर म्हणाले कि थकबाकीच्या
२५ ते ५० % रक्कम सदर ग्रामपंचायत यांनी जर भरली तरीही हा पाणीपुरवठा सुरु
करण्यात येईल असे सांगितले
त्याच बरोबर जी.प. सदस्य नयना
ताई डोके यांनी सांगितले कि दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि काही तांत्रिक
अडचणींमुळे हा भरणा थकला असून लवकरच हा भरण्यात सर्व ग्रामपंचायत प्रयत्न
करतील.
(प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे)
