आळेफाटा (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
                         पुणे नाशिक महामार्ग ५० आणि नगर कल्याण महामार्ग २२२  या दोन्ही महामार्गांच्या मध्यवर्ती भागावर आणि सर्वात महत्वाच मानले जाणारे आळेफाटा बसस्थानक हे नेहमीच चर्चेचा एक भाग  होत आहे.प्रशासन दखल घेत नाही म्हणूच  राष्ट्रीय छावा संघटनेने उचलेले कडक पाऊल .
    गेल्या काही दिवसांपासून या बसस्थानकाची अवस्था अत्यंत दुर्मिळ झालेली असून या बस स्थानकाकडे म.रा.प. मंडळ किंवा प्रशासन  कुठलीही दखल घेत नाही.या बस स्थानकामध्ये  दररोज साधारणपणे १५० ते २०० बस  ये जा करत असतात. त्यातूनच हजारो प्रवासी ये जा करतात.अक्षरशः या स्थानकाच्या आवारात वारण्यात आलेली डांबरीकानासाठी वापरलेली  खडी  मोकळी झाली असून स्थ्नाकात ये जा करणाऱ्या बस च्या टायर खालून हे दगडी उडून प्रवाशांना लागून अनेक प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे.
 अधिक माहिती देताना राष्ट्रीय छावा संघटनेचे पश्चिम  महाराष्ट्र अध्यक्ष विजुभाउ देवकर यांनी सांगितले कि  या बस स्थानकाकडे प्रश्सन लक्ष देत नसल्याने त्याचप्रमाणे या बस् स्थानकामुळे अनेक प्रवाशी आणि स्थानिक नागरिक याच्या जीवाला धोका निर्माण होत आहे या अगोधर अनेकवेळा संबधित अधिकार्याशी या बाबत चर्चा करून या सर्व प्रकारची कल्पना दिलेली असून अनेक प्रवाश्ना हे दगडी लागल्या नंतर स्वतः देवकर व त्यांचे सहकारी यांनी त्या प्रवाशी आणि स्थानिक नागरिक यांना दवाखान्यात नेले आहे. परंतु हे किती दिवस चालणार म्हणून या बस स्थान कामुळे होणर्या या सर्व बाबींचा म. रा.प. मंडळ यांनी जर विशेष दाखल घेतली नाही तर राष्ट्री छावा संघटा हि नागरिकांच्या सेवा आणि सुरक्षितेसाठी रोडवर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल असा आश्रय या संघटनेचे प.म.अध्यक्ष विजुभाउ देवकर यांनी सांगितले.
                                                                                                     (प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे)
 
 
 
 
Top