माळशिरस ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -  पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती पुरंदर, व  एकात्मिक बाल विकास सेवा
योजना पुरंदर अंगणवाडी  यांचे वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व
बालिका दिन या निमित्ताने अंगणवाडी विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला स्पर्धा
घेण्यात आली.यावेळी माळशिरस अंगणवाडी मध्ये सर्वप्रथम उज्वला मगर यांचे हस्ते
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुण कार्यक्रमास सुरवात झाली.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित काही गाणी व भाषणे झाली .
त्यानंतर  विद्यार्थ्यांना आधोरेखीत चित्रे व. रंग देवुन स्पर्धेस सुरवात
झाली. ( प्रतिनिधी - विनय गुरव )
 
Top