नवी दिल्ली (पुणे सुपरफास्ट न्यूज) -वृत्तसंस्था
पूर्व आणि ईशान्य भारताचा परिसर सोमवारी पहाटे भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला. या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मणिपूरच्या तमाँग जिल्ह्यात भुपृष्ठापासून १७ किलोमीटर खोलवर या भूकंपाचा केंद्रबिंदू नोंदविला गेला आहे. आज पहाटे ४.३७ वाजण्याच्या सुमारास मणिपूर, आसाम, अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मिझोरम आणि त्रिपुरासह ईशान्य आणि पूर्व भारताच्या अनेक भागांमध्ये हे धक्के जाणवले. सध्याच्या माहितीनुसार, या भूकंपामुळे इम्फाळमध्ये एक इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत, तर पश्चिम बंगालमधील सिलिगुडीमध्येही अनेक जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करून त्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ईशान्य भारताचा परिसर जगातील सहाव्या क्रमांकाचे भूकंपप्रवण क्षेत्र मानले जाते. गुवाहाटीमध्ये साधारण एका मिनिटात दोनवेळा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यामुळे येथील नागरिक घाबरून रस्त्यावर आले. तर इम्फाळमध्ये साधारण मिनीटभर जमीन हादरत होती. त्यामुळे अनेकांच्या घरातील सामानाची पडझड झाली आहे. याशिवाय, पश्चिम बंगाल, आसाम, अरूणाचल, नेपाळ, बांगलादेश, झारखंड, बिहारमध्येही हे धक्के जाणवले आहेत.