पुणे (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
शहरात पाणीकपात लागू केल्यानंतर पहिल्या चार महिन्यांत म्हणजे, डिसेंबरअखेरपर्यंत दोन टीएमसी पाण्याची बचत झाली असून, येत्या जुलैपर्यंत आणखी तीन टीएमसी पाण्याची बचत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा उपयुक्त ठरला आहे.
दिवसाआड पाणीपुरवठ्याबरोबच जलवाहिन्यांमधील पाणी गळती रोखणे, त्याचा अपव्यय टाळणे. बांधकाम आणि अन्य व्यावसायिक कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास घातलेल्या निर्बंधामुळे पाण्याची बचत झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुढील सहा महिने या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पावसाने दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने सप्टेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सम आणि विषम तारखेनुसार हा पाणीपुरवठा होतो. त्यासाठी रोज 850 एमएलडी पाणी धरणातून घेण्यात येत आहे. त्यामुळे महिन्याकाठी पुणेकरांना सध्या एक टीएमसीपेक्षाही कमी पाण्याचा पुरवठा होतो. शहरात पाणीकपात होण्यापूर्वी म्हणजे, नियमित पाणीपुरवठा असताना, रोज 1250 एमएलडी पाणी धरणातून सोडले जात होते. त्यामुळे महिन्याला जवळपास सव्वा टीएमसी पाणीपुरवठा होता. दिवसाआड पाण्यापुरवठ्यामुळे महिन्याला आतापर्यंत दोन टीएमसी पाण्याची बचत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.