हवेली (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
         महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या नियमानुसार आणि पुणे जिल्हा कुस्तीगिर संघाच्या मान्यतेने या स्पर्धा दरवर्षी भरविल्या जातात. यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष होते. पुरुष आणि महिला गटाबरोबरच १४ वर्षाखालील कुमार गट देखील या स्पर्धेत होते. या स्पर्धेत एकुण  ४८० स्पर्धक सहभागी झाले होते. 
 ३२ किलो वजन गट ते ७४ किलो वरील खुला वजन गटातील स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्याकडून रोख ५१ हजार रुपये आणि चांदीची गदा प्रथम येणाऱ्या विजेत्यास दिली गेली.१४ आणि  १५ जानेवारी रोजी एन.डी.ए रोडवरिल शिवणे गावातील कै. बबनराव विठोजी दांगट(पाटील) क्रिडा नगरी येथे या स्पर्धा पार पडल्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासणे व  संजीव नाईक यांच्या हस्ते समीर कोळेकरला  हवेली अजिंक्य कुस्तीस्पर्धेचा किताब , रोख ५१ हजार रुपये आणि चांदीची गदा देवून गौरविण्यात आले.

एटीएसचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, पुणे महापालिकेचे नगरसेवक सचिन दोडके, आप्पासाहेब खुटवड, विश्वनाथ चौधरी, तानाजी सोरटे, रामदास दांगट आदी उपस्थित होते.



 
Top