मुंबई (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
     गुलाम अलींनी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी टि्वटरवरुन दिली आहे. गुलाम अलींच्या या कार्यक्रमावरुन आतापासूनच ठाण्यामध्ये राजकीय वादावादी, आव्हान-प्रतिआव्हानाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी कलाकरांचे महाराष्ट्रात कार्यक्रम आयोजित करायला शिवसेनेचा प्रखर विरोध दर्शिवला आहे.
शिवसेनेला जे करायचय ते करुं दे,” अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. तर, “आव्हाडांनी कार्यक्रम करुन दाखवावा,” असे प्रतिआव्हान शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. त्यामुळे येणारा काही काळ आरोप-प्रत्यारोपांनी गाजणार हे निश्चित आहे.




 
Top