नवी दिल्ली (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
  ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणाऱ्या तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी दुखापतग्रस्त महंमद शमीच्या जागी जसप्रीत बुमराहचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, या दौऱ्यात भारतीय संघाला आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही एकदिवसीय सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे. भारतीय गोलंदाजी सुमार दर्जाची होत असल्याने तिनशेपेक्षा अधिक धावा करुनही पराभव होत आहे. 
 शमीला सुरवातीला एकदिवसीय संघातून बाहेर व्हावे लागले. आता ट्वेंटी-20 मालिकेतही तो खेळणार नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या बुमराहला त्याच्याजागी स्थान मिळाले आहे.


 
Top