सना (येमेन) (वृत्तसंस्था- पुणे सुपरफास्ट न्यूज)-
पोलिसांचा वावर असलेल्या
एका इमारतीवर हवाई हल्ला करण्यात आला असून यामध्ये 20 पोलिस ठार तर 15 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सुरक्षा विभागाने आज (सोमवार) दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हौथिस येथील एका इमारतीचा वापर पोलिसांची वाहने उभी करण्यासाठी केला जातो. या इमारतीवर हवाई हल्ला करण्यात आला. यामध्ये 20 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रविवारी (ता. 17) रात्री उशिरा हल्ला करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.