नवी दिल्ली (पुणे सुपरफास्ट न्यूज) :
भाकपचे माजी महासचिव ए. बी. वर्धन यांचे दिल्लीच्या एका खासगी रुग्णालयात शनिवारी रात्री 8.30 वाजता निधन झाले. वयाच्या 91 वर्षी दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. ते मूळचे नागपूरचे होते.
गेल्या महिन्यात त्यांना पॅरालिसीसचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावल्याने वर्धन यांचे निधन झाले. राज्यातील डाव्या विचारसरणीच्या नेत्यांमध्ये त्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अर्धेंदू भूषण वर्धन म्हणजेच ए.बी.वर्धन यांचा जन्म 24 सप्टेंबर 1924 रोजी जन्म झाला. 1957 मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर 1990 साली ते दिल्लीच्या राजकारणात गेले.