नागपूर  (पुणे सुपरफास्ट न्यूज) :वृत्तसंस्था
            ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी काहीही करुन पद्मभूषण देण्याची मागणी केल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. त्यामुळे सरकारकडून देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांवर आता प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत.
 आता मात्र  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच दिल्लीत पद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग होत असल्याचा गौप्यस्फोट केल्याने त्यात काही तथ्य असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, माझ्या इमारतीची लिफ्ट बंद होती, मात्र आशा पारेख तब्बल 12 मजले चढून आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी आपल्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे मात्र, भारतीय चित्रपटातील माझे योगदान पाहता मला पद्मभूषण पुरस्कार मिळावा अशी मागणी त्यांनी केली होती. असा दावा गडकरींनी केला आहे. तसेच या पुरस्कारांसाठी एवढी रस्सीखेच होते की, पुरस्कार नेमका कोणाला द्यावा असा प्रश्‍न आमच्यासमोर असतो असेही त्यांनी म्हटले. मात्र, गडकरींच्या या दाव्यांचे आशा पारेख यांनी लगेचच खंडण करत आपण अशा प्रकारची कोणतीही शिफारस केली नसून यापेक्षा आपण जास्त काही बोलू इच्छित नसल्याचे म्हटले आहे.


 
Top