माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्युज) -
       संपुर्ण महाराष्ट्रात जागृत देवस्थान व पुणे जिल्ह्यात शिल्पकलेचा खजिना म्हणुन ओळख असणा-या  भुलेश्वर. मंदिरात प्रजासत्ताक दिना निमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले.जानेवारी महिन्यातील चौथा शनिवार,रविवारची साप्ताहिक सुट्टी, महादेवाचा सोमवार व मंगळवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असे सलग चार दिवस भाविकांनी भुलेश्वर दर्शनासाठी गर्दी केली होती तर ज्या भाविकांचे नातेवाईक आप्तेष्ठ भुलेश्वर मंदिर परिसरात राहतात त्या भाविकांनी देवदर्शनानंतर नातेवाईकांकडे हुरडा पार्टिचे पुर्व नियोजन केले होते.
 (प्रतिनिधी - विनय गुरव)

 
Top