माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्युज) -
वार्ताहर
महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या
भुलेश्वर मंदिरात नेहमीच पर्यटक ,
भाविक तथा अभ्यासकांची गर्दी दिसते . कारण या परिसरातील निसर्ग सौंदर्य निसर्ग
प्रेमी पर्यटकांना भुरळ घालण्यासारखेच आहे . तर शिल्पशास्त्र अभ्यासकांसाठी येथील
शिल्पकला म्हणजे एक प्रकारचा खजिनाच आहे .प्रजासत्ताक दिनानिम्मित्त मिळालेल्या सुट्टीचा
फायदा घेवून पुणे येथील डेक्कन महाविद्यालयातील पुरातत्व शास्त्र विभागाच्या
शिक्षक व विद्यार्थ्यांनी भुलेश्वर मंदिरातील शिल्पकलेचा अभ्यास केला .यावेळी
अभ्यासकांनी विद्यार्थ्यासोबत दर्शनासाठी आलेल्या पर्यटक व भाविकांना देखील येथील
शिल्पकलेविषयी माहिती दिली .यावेळी एका भाविकाने विचारलेल्या प्रत्येक मंदिर
निर्मितीत महत्वाचे स्थान कोणाचे या
प्रश्नावर बोलताना डॉ. अभिजित दांडेकर
म्हणाले कि मंदिर निर्मितीत निर्मात्यापेक्षा वास्तू रचनाकाराला फार महत्व आहे.
निर्माता फक्त सांगतो कि , कोणत्या कोणत्या मूर्तीची स्थापना मंदिरात करावयाची
परंतु वास्तू रचनाकार ठरवतो कि कोणती मूर्ती कोठे स्थापित करायची.आणि यानुसार
शिल्प सौंदर्याने ओतप्रोत भरलेला प्रदक्षिणा मार्ग आणि मोठ्या आकाराच्या मूर्ती
सूर्याचे गर्भ गृहातील मूर्तीवर पडणारे पहिले किरण यांची अगदी जागच्या जागी
व्यवस्थित मांडणी केलेली आढळते . रचनाकारांच्या आभ्यासामुळेच पुरातन मंदिरे आजही
पर्यटक ,अभ्यासक,व भाविकांना भुरळ घालतात .या अभ्यासकांनी मंदिर व परिसराची
बारकाईने पहाणी करून अभ्यास केला. (प्रतिनिधी - विनय गुरव)
