पारगाव,पुरंदर (पुणे सुपरफास्ट न्युज) -
दि.२६
रोजी परगावची भैरवनाथ मंदिरात ग्रामसभा झाली,यावेळी पुण्यातून गावात
येणारा कचरा आणि चौदावा वित्त आयोगाचा आराखडा यावरून प्रचंड गोंदळ झाला.
चौदावा वित्त आयोगाचा येणारा निधीचा खर्च कोणकोणत्या विकास कामासाठी
वापरण्यात यावा यावरून एकवाक्यता होत नसल्याने गोंधळ निर्माण झाला.दरम्यान
यावर तोडगा काढत ग्रामपंचायत सदस्या सौ.दक्षता गणेश मेमाणे व नवनाथ मेमाणे
यांनी विचार मांडले कि येणारा निधी हा लोकसंख्या निकषानुसार येतो तर त्याचा
वापर देखील त्यानुषारच करण्यात यावा यावर सर्वांचे एक मत होऊन आराखडा तयर
करण्यात आला ,तशेच पुण्यातून गावामध्ये येणाऱ्या कचऱ्या संधर्भात सरपंच व
ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेऊन गावात कचरा आणण्यास विरोध दर्शवला .या
विषयांबरोबर ग्रामपंचायत कर वाढ.जैवविविधता समिती निवड आदी विषयांवर चर्चा
झाली.
यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ,युवक कॉंग्रेसचे
तालुकाध्यक्ष गणेश मेमाणे,राजेंद्र गायकवाड,बापू मेमाणे,जालिंदर मेमाणे
,विठ्ठल मेमाणे ,संगीता मेमाणे,संतोष रोकडे,छबुताई चव्हाण,चेतन
मेमाणे,तंटामुक्ती अध्यक्ष महादेव मेमाणे,स्वप्नील गायकवाड,सुनील
मेमाणे,तु.रा.मेमाणे,दतात्रय मेमाणे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते,ग्रामसेवक डी.बी.जाधव यांनी इतिवृत्ताचे वाचन केले
(प्रतिनिधी - स्वप्निल गायकवाड)
