माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्युज)-
               . प्रजासत्ताक दिनानिम्मित्त सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीत अंगणवाडी, जि.प.प्राथमिक शाळा , सनब्राईट इंग्लिश मिडीअम स्कूल व भुलेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . यावेळी सर्व प्रथम ग्राम पंचायत कार्यालय येथे  सरपंच सौ.सुरेखा सुनील यादव यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले . यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र , जि.प.प्राथमिक शाळा व  मासूम संस्था इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण करून प्रभातफेरी भुलेश्वर विद्यालयाच्या मैदानावर पोहचली. भुलेश्वर विद्यालयातील कार्यक्रमात सर्व प्रथम मान्यवरांना  विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली .यानंतर भुलेश्वर विद्यालयाचे संचालक श्री वामन गद्रे यांचे  ध्वजारोहण करून ध्वजासंहिते प्रमाणे राष्ट्रीय सलामी देवून राष्ट्रगीत झाले . यानंतर मान्यवरांची भाषणे , विद्यार्थ्यांची भाषणे व मान्यवरां समोर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले .यावेळी महिंद्रा आणि महिंद्रा चे मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक श्री भानुदास माने हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते .त्यांनी यावेळेस  विद्यालयास देणगी ११००० रुपयेचा धनादेश दिला. यावेळी सरपंच सुरेखा यादव,ग्रामसेवक संदीप ठवाळ,उपसरपंच काकासो यादव, माजी उपसरपंच हिरालाल यादव भुलेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक वामन गद्रे , साहेबराव यादव , सचिव विश्वास चव्हाण मुख्याध्यापक संजय भुंजे सर्व सहशिक्षक  जि.प. प्राथमिक शाळा माळशिरसच्या मुख्याध्यापिका सौ. सुमित्रा डावरे व सर्व सहशिक्षक सनब्राईट इंग्लिश मिडीअम स्कुलच्या प्रीन्सिपोल थोरात मिस व सर्व सहशिक्षक ग्राम पंचायत माळशिरसचे सर्व सदस्य व कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
 (प्रतिनिधी -विनय गुरव)


 
Top