रायगड (पुणे सुपरफास्ट न्युज) -
राज्य सरकारच्या कला व
सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने २१ ते २६ जानेवारी
दरम्यान रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात
येणार आहे. या महोत्सवाच्या
तयारीला जोरदार सुरुवात करण्यात आहे.
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी
असलेल्या पाचाड येथे शिवसृष्टी
उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
महोत्सव काळात राज्यातील विविध भागात
बनणाऱ्या २०० वस्तूंचे स्टॉल्स
लावले जाणार आहेत. महाड ते रायगड
रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम
टप्प्यात आले आहे. महोत्सवासाठी येणारे
मान्यवर, कलाकार, पर्यटक यांची
निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था यांचे
नियोजन पूर्ण झाले आहे. पाचाड
जवळील परिसरात वाहनतळाची व्यवस्था केली
जाणार आहे. या महोत्सवात ३० ते ३५
हजार पर्यटक सहभागी होण्याची शक्यता
वर्तवली जाते आहे. ही बाब लक्षात घेऊन
गडावर जास्तीत जास्त लोकांना जाता यावे
यासाठी रोप वेची क्षमता वाढवण्यात
आली आहे. यापूर्वी एका वेळला केवळ ८
प्रवासी या रोप वेने प्रवास करू शकत
होते. आता १२ प्रवासी एका वेळला प्रवास
करू शकणार आहेत. त्यामुळे दिवसभरात
तीन ते चार हजार पर्यटक रोप वेचा वापर
करू शकणार आहे
राज्य सरकारने महोत्सवाच्या संयोजन
समितीच्या प्रमुखपदी सुप्रसिद्ध
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची निवड
केली आहे. देसाई यांच्या पथकाकडून
सध्या रायगडच्या पायथ्याशी असलेल्या
जिजाऊ वाडा परिसराजवळ शिवसृष्टी
साकारण्याचे काम सुरू आहे. २०० कामगार, १५ तंत्रज्ञ यांच्या
माध्यमातून हे काम केले जाते आहे. किल्ले रायगडावर आणि पाचाड येथे दोन ठिकाणी
एकाच वेळी हा महोत्सव होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाटय़
रूपांतर करून येणाऱ्या पर्यटकांसमोर सादर केला जाणार आहे. राज्यभरातील
५०० कलाकार या महोत्सवात सहभागी होणार
असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सागण्यातले जाते.
