“आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना व व्हायब्रंट एचआर यांच्यामध्ये कामगार विषयक उपक्रमांसाठी करार”

पिंपरी (पुणे सुपरफास्ट न्युज) -
        मानव संसाधन क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या व्हायब्रंट एचआर संघटनेचा प्रथम वर्धापन दिन भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पुरस्कार वितरणकामगार व व्यवस्थापनातील संबंधांचा उहापोह,शास्त्रीय संगीताची जुगलबंदी असे कार्यक्रम यानिमित्ताने रंगले.  

 आंतराष्ट्रीय श्रमिक संघटनेचे (आयएलओ) मुख्य तांत्रिक सल्लागार थॉमस क्रिंगमराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख,  कामगार उपायुक्त रत्नदीप हेंद्रेसहायक कामगार आयुक्त संभाजी काकडेसुनील बागलआयएलओचे राष्ट्रीय प्रकल्प समन्वयक जी. एल. नरसीभारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिकअॅड. श्रीनिवास इनामतीअॅड. राजीव जोशीअॅड. आदित्य जोशीफिनोलेक्स कंपनीनेच माजी महाव्यवस्थापक पी. डी. पाटीलसिंहगड अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. विजय वधाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय संगीताच्या जुगलबंदीने झाली.पंडित अजय बक्षी व पंडित ऋषिकेश जगताप यांनी सतार व तबलावादनाची जुगलबंदी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यानंतर व्हायब्रंट एचआर संघटनेच्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा व्हायब्रंट एचआरचे कुटुंबप्रमुख शंकर साळुंखे व राम होनप यांनी घेतला. थॉमस क्रिंग यांनी आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना व व्हायब्रंट एचआर यांच्यामध्ये कामगार विषयक उपक्रमांसाठी करार करण्याची घोषणा यावेळी केली. तसेच त्यांनी व्हायब्रंट एचआरग्रुपच्या कामाची प्रशंसा केली. रघुनाथ कुचिक यांनी 'एचआरहा कामगार व व्यवस्थापन यांच्यातील दुवा असल्याचे सांगितले. डॉ. अनंत सरदेशमुख  यांनी व्हायब्रंट एचआरच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. कामगार उपायुक्त रत्नदीप हेंद्रे व संभाजी काकडे यांनी औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी व्हायब्रंट एचआर संघटनेचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले. 

याप्रसंगी मानव संसाधन विभागाविषयी पुस्तके आणि ब्लॉगच्या माध्यमातून मार्गदर्शन केल्याबद्दल डिएसएम इंजिनिअरिंग प्लास्टिक्स इंडिया कंपनीचे मानव संसाधन विभागाचे संचालक विनोद बिडवाईक व मानव संसाधन विभागात विविध सामाजिक व वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून ठसा उमटविल्याबद्दल मिंडारिका कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक पांडुरंग गबदुले यांना 'व्हायब्रंट एचआर गौरव'पुरस्कार प्रदान करण्यात आला. याखेरीज ४४ जणांना 'स्टार कॉन्ट्रीब्युटर्सतर  सामाजिक कार्याबद्दल इतर ३८ जणांचा विशेष गौरव करण्यात आला. 

 व्हाटसप सारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करून किती मोठे  काम उभे करू शकता येते याची प्रचीती व्हायाब्रंट एच आर ग्रुपद्वारे येते.२२ लोकानी एकत्र येऊन मानव संसाधन क्षेत्रासमंधी ज्ञानाची देवाणघेवाण करणे व वेगेवेगळ्या विषयावर चर्चा करून एच आर  क्षेत्रातील एक हक्काच व्यासपीठ तयार करण्यासाठी सुरु केलेल्या या व्हायाब्रंट एच आर ग्रुपचे रुपांतर २३०० लोकांच्या एका मोठ्या समुहात झाले आहे.व्हायाब्रंट एच आर ग्रुपचे,व्हायाब्रंट एच आर  पोलीस मित्र मंडळ ,व्हायाब्रंट एच आर  भटकंती ,व्हायाब्रंट एच आर जॉब फोरम,व्हायाब्रंट एच आर पर्यावरण व अघोगिक सुरक्षा असे विविध ग्रुप आहेत

 या सर्व कार्यक्रमामध्ये शंकर साळुंखे यांनी स्वागत केले. राम होनप यांनी प्रास्ताविक केले. तर सुधीर पाटील यांनी आभार मानले. शीतल साळुंकेअभिजित शेटेसचिन गायकवाडअमित केदारीबंडू कुंभार,सविता गरुडसोनाली घोडकेविशाल भांगे,विभावरी लोंढे, रविराज शिंदेस्मिता नारकरशीतल जगतापउपेंद्र तिवारीअस्लम शेखसाईदर्शन घोडकेसंदीप फुकेअजय रोफलेकरमहेंद्र यादवदादासाहेब थोरातगणेश कदमजगदीश मुळेमंदार देशपांडेमिलिंद पोरेविक्रांत भाटेनिर्मला जाधवदिपक खोतअनुराधा पवार,सचिन पवार. सतिश कुलकर्णीपंकज रत्नपारखीप्रियंका निढाळकरअमोल देशपांडेममता यादवप्रकाश राठोड,सुशांत खोत यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

रविराज शिंदे
8600866161







 
Top