वृत्तसंस्था (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
राज्यात आजपासून (ता. 15) शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू होणार आहे. याबाबत दिलेल्या आदेशाप्रमाणे नियोजन झाले की नाही, याची माहिती घेण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माहिती घेतली.
15
ते 31
जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील
कोणत्या भागातील मुलांचे सर्वेक्षण
करायचे आहे. "युडायस‘ डाटा विचारात घेऊन
ज्या केंद्रामध्ये 10 टक्क्यांपेक्षा विद्यार्थ्यांची अधिक गळती आहे, त्या केंद्रामध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. अशा केंद्रात 2007-08 मध्ये
इयत्ता पहिलीत दाखल झालेली मुले2015-16 मध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहेत.
