वृत्तसंस्था (पुणे सुपरफास्ट न्युज)-

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्रांना भांडवलाची चणचण भासणार नाही असा सरकारचा प्रयत्न राहिला असून, पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत या क्षेत्राला आजवर ४२,००० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केलेही गेले आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी लोकसभेत शुक्रवारी दिली.
प्राधान्य क्षेत्राला कर्जपुरवठय़ाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वाणिज्य बँकांनी त्यांच्या एकूण कर्ज वितरणाच्या ७.५ टक्के कर्ज हे सूक्ष्म उद्योजक व कारागिरांना वितरित करणे बंधनकारक केले गेले आहे. सरकारने क्रेडिट गॅरन्टी फंड ट्रस्टमार्फत छोटय़ा उद्योजकांच्या १ लाख कोटी रुपयांपर्यंत कर्जासाठी पतहमी बँकांना प्रदान केली असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
चालू वर्षांत एप्रिलमध्ये दाखल झालेल्या मुद्रा योजनेतून छोटे उद्योजक व कारागीर यांना १० लाख रुपये व त्यापेक्षा कमी रकमेच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट राखले गेले. योजनेतून आजवर वितरित ४२,००० कोटी रुपयांचे तब्बल ६६ लाख लोक लाभार्थी ठरले आहेत.


 
Top