नागपूर
(पुणे सुपरफास्ट न्युज):-
गेल्या अधिवेशनात युती सरकार नुकतेच सत्तेवर आले होते. त्यामुळे आम्ही
नवीन आहोत वेळ द्या, असे
अधिवेशनात त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, आता सरकार चालवून 13 महिने झाले आहेत. त्यामुळे त्यांनी
आम्ही नवीन आहोत असा रडीचा डाव बंद करावा, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिला.
पवार म्हणाले, की राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातील नेत्याच्या मेहुण्याने आत्महत्या करावी, याचा अर्थ घरच्यांनाही सरकारवर विश्वास उरला नाही. सरकार संत्रा, कापूस, सोयाबीन, ऊस या पिकांच्या हमीभावावर निर्णय घ्यायला तयार नाही. दुसरीकडे यांच्यासोबत असलेली शिवसेना पुण्यात "वरणभात‘ मोर्चा काढते, याला काय म्हणायचे. दोन्ही पक्षात काय सुरू आहे, हे कळायला मार्ग नाही. तेव्हा हे सरकार निर्णय घेण्यात अपयशी ठरले असून केवळ जनतेला बनवयाचे काम करीत आहे.