औरंगाबाद(पुणे सुपरफास्ट न्युज) :आज साजरा होणाऱ्या घटनेचे शिल्पकार डॉ.आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने महाराष्ट्रातून  डॉ.आंबेडकराना मानणारे चळवळीतील कार्यकर्ते मुंबई इथे जात आहेत.
  काल हे सर्वच कार्यकर्ते औरंगाबाद स्टेशन वरून पुढील प्रवसाला गेले त्या वेळेस या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय दलित कोब्राच्या वतीने अन्न दान कार्यक्रम औरंगाबाद स्टेशन वरती पार पडला.
   सदरच्या कार्यक्रमा साठी अनेक कार्यकर्ते उपस्तिथ होते ज्यांनी स्टेशन परिसर डॉ.आंबेडकरांच्या नावाच्या जयघोषाने भरून गेला होता.या कार्यक्रमासाठी भारतीय दलित कोब्रा चे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ बोर्डे तसेच जिन्सी पो.स्टेशन चे पो.निरीक्षक मा.शिवाजी कांबळे साहेब आणि औरंगपुरा पो.स्टेशन चे पो.निरीक्षक मा.चक्रे साहेब प्रमुख उपस्तिथ होते.दु.२ वाजता अन्न वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.    (प्रतिनिधी:ज्ञानेश भुकेले) 

                            
 
Top