पुणे (पुणे सुपरफास्ट न्युज) :-
२१०६ हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वी जयंती वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. म्हणून पालिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेवकांनी या वर्षीच्या मॅरेथॉनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, असे नाव द्यावे आणि ही मॅरेथॉन घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांना समर्पित करावी, अशी मागणी केली आहे.

ज्या उत्साहात व दिमाखात पुण्यात माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा सुरू केली. त्या मॅरेथॉनचे वलय दिवसेंदिवस कमी होत असल्याचे जाणवत आहे. येत्या ६ डिसेंबरला ३० वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन होणार आहे. सुरेश कलमाडी असताना या मॅरेथॉनचा थाटबाट हा वेगळाच होता. पुण्याची जागतिक ओळख निर्माण व्हावी यासाठी १९८३ मध्ये ही पुणे मॅरेथॉन स्पर्धा सुरू करण्यात आली. मॅरेथॉन सुरू केल्यानंतर ही मॅरेथॉन कशी चांगल्या पध्दतीने पार पडेल किंवा याची प्रसिध्दी कशी करता येईल, याकडे खुद्द सुरेश कलमाडी यांनी विशेष लक्ष दिले. प्रत्येक वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री, अभिनेते यांना पुण्यात बोलवायचे असा हा दिमाखदार सोहळा व्हायचा अनेक मोठमोठ्या कंपन्यांचाही यामध्ये सहभाग असायचा.पण आता मात्र एक प्रकरच वलय या स्पर्धे वर आलेल दिसतंय.  (प्रतिनिधी :ज्ञानेश भुकेले)

 
Top