पुणे (पुणे सुपरफास्ट न्युज) :- 
  स्वतच्या तोर्याटत जळणारा टोल नाका म्हणजे खेड शिवापूर अशी ओळख झालेला टोल नाका आणि प्रचंड वाहनांच्या गर्दीत असलेला हा टोल तसा पुणे सातारा रोड वर प्रवास केलेला माणूस विसरणार नाही,इथले अधिकारी न शासनाला जुमनतात ना अधिकारयाला पण पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क 3 मिनिटांपेक्षा जास्त काळ वाहनांना रांगेत ताटकळत राहावं लागलं तर वाहनं टोल फ्री कऱण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही? हे कोण तपासणार? याचं उत्तर कुणाकडेच नाही आहे नेहमी प्रमाणे .
    खेड शिवापूरचा टोल खच्चून गर्दीसाठी प्रसिद्ध आहे. कारण वीकएन्डला इथं दोन-दोन किलोमीटरच्या रांगा लागतात. परिणामी पेट्रोल-डिझेलसह लोकांचा बहुमोल वेळ वाया जातो. त्यामुळं 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ टोलवर काढावा लागला, तर विनाटोल वाहनं सोडून देण्याचा आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिला आहे.जिल्हा प्रशासनाच्या निर्णयावर वाहनचालकांनी समाधान व्यक्त केलं आहे. पण (सरकारला न जुमानणारी) रिलायन्स कंपनी अंमलबजावणी करणार का? हा प्रश्न आहे.
नियमाप्रमाणं 15 सेकंदापेक्षा जास्त काळ टोलनाक्यावर वाहनं उभं राहू नये. मात्र टोलनाक्यांवरील गर्दीमुळं
१ तासा पेक्षा हि जास्त काळ कधी कधी वाहनं रांगेत उभी राहतात. ज्यामुळं पेट्रोल-डिझेलसोबतच कोट्यवधी रुपयांच्या मनुष्यबळाचाही तोटा होतो.
  पुणे-सातारा हा 120 किलोमीटरचा रस्ता आहे. त्यात खेड शिवापूर आणि आनेवाडी अशा दोन ठिकाणी टोल वसूल केला जातो. रस्त्याचे सहापदरीकरणाचं काम गेली 4 वर्ष सुरु आहे. अनेक ठिकाणी डायव्हर्जन्स आहेत. रस्त्यात खड्डे आहेत. अशावेळी नियमानुसार टोलवसुली स्थगिती करायला हवी. पण त्यावर ना राज्यकर्ते बोलतात ना अधिकारी. त्यामुळं टोलचा प्रश्न सोईस्करपणे हाताळण्याची मानसिकता बदलायला हवी.             (प्रतिनिधी-ज्ञानेश भुकेले)


 
Top