(पुणे सुपरफास्ट न्युज)-
परमार आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांना अटक झाली असतानाच, पोलिसांनी उच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या कागदपत्रांवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेवर कुरघोडी करण्याच्या उद्देशानेच सरकारमधील उच्चपदस्थांच्या मान्यतेनेच कागदपत्रे उघड केली गेल्याचे बोलले जाते.
उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या परमार यांच्या डायरीमध्ये ई.एस. असा उल्लेख करण्यात आला आहे. हे ई.एस. कोण, अशी विचारणा न्यायालयाने केली असता त्याची चौकशी केली जाईल, असे विशेष सरकारी वकिलांकडून सांगण्यात आले. हे ई.एस.कोण, याची चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्ह्य़ातील नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला जात आहे. ही चर्चा सुरू झाल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली
आहे.
स्वत: शिंदे हे कमालीचे संतप्त झाले असून, त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेच्या नेतृत्वाकडे नापसंती व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.




 
Top