मुंबई (पुणे सुपरफास्ट न्यूज) - अभिनेत्री साधना शिवदासांनी यांना शनिवारी अखेरचा निरोप देण्यात आला.सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
करण्यातआले. त्यावेळी
चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी उपस्थित होते. साठ आणि सत्तरच्या दशकात अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्याहोत्या. आपल्या अभियनाने त्यांनी चित्रपट रसिकांवर मोहिनी घातली होती.साधना यांच्या पार्थिवावर शनिवारी सांताक्रूझ येथील स्मशानभूमीतअंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिनेत्री हेलन, दीप्ती नवल, पूनमसिन्हा, अभिनेते रझा मुराद, सलीम खान आदी
मान्यवर उपस्थित होते. गेले काही दिवस कर्करोगाने आजारी असलेल्या साधना यांचे शुक्रवारी
हिंदुजा रूग्णालयात निधन झाले.