पाथर्डी (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते
गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वाटचालीत
महत्त्वाचा अध्याय ठरलेला भगवानगडावरील (तालुका पाथर्डी, नगर) दसरा मेळावा बंद करण्याचा निर्णय या गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री
यांनी शनिवारी जाहीर केला. गडावर यापुढे
दसऱ्याचा पारंपरिक धार्मिक उत्सव साजरा होईल,
राजकीय
मेळावा येथे होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
(स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वाटचालीत भगवानगडावरील दसऱ्याच्या राजकीय मेळाव्यास विशेष महत्त्व आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सन १९९५ मध्ये त्यांनीच हा राजकीय मेळावा सुरू केला होता. त्याला होणारी लाखोंच्या गर्दीमुळे पुढे या मेळाव्यातच मुंडे यांच्या राजकारणाची दिशा ठरत असे. या मेळाव्याला मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात वेगळे महत्त्व मिळवून दिले होते. त्यामुळेच दसऱ्याच्या दिवशी मुंडे काय भूमिका घेतात हे पाहण्यासाठी राज्याच्या राजकीय वर्तुळाचे महत्त्व या मेळाव्याकडे लागे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही मुंडे यांनी भगवानगडावर याच मेळाव्यातून अनेकदा लक्ष्य केले होते.
मुंडे यांनी राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाचे सूतोवाचही येथेच केले होते. त्यावेळीचे त्यांचे ‘मला गडावरून दिल्ली दिसते’ हे वक्तव्य आणि त्याअनुषंगाने केलेले राजकीय भाष्य राज्यात चर्चेचा विषय ठरले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी भाजपसह अन्य पक्षातील दिग्गज नेतेही भगवानगडावर आणून वेगळी राजकीय मोर्चेबांधणीही केली. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनीही गडावरील दसऱ्याच्या राजकीय मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवली होती.